बंगाली हिंदूंसाठी आवाज उठवणारे युझर्स ट्विटरकडून निलंबित

02 Dec 2021 14:02:53
Bengali hindu_1 &nbs
 
नवी दिल्ली : बंगाली हिंदूंसाठी आवाज उठवणाऱ्या 'स्टोरीज ऑफ बंगाली हिंदूज' नावाचे हँडल ट्विटरने निलंबित केले आहे. हे हँडल चालवणारे डॉ. संदीप दास यांनी या कारवीची माहिती दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, "बंगाली हिंदूंसाठी आवाज उठवणारे त्यांचे ट्विटर हँडल निलंबित करण्यात आल्याची माहिती देताना मला निराशा होत आहे. मला ही माहिती १ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.१७ वाजता मिळाली." नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण पुढे करत ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
 
'स्टोरीज ऑफ बंगाली हिंदुज' (@storiesOfBHS) नावाचे हे ट्विटर हँडल बंगाली हिंदूंवरील अत्याचार आणि त्यांच्या हक्कांवर आवाज उठवत होते. डॉक्टर संदीप दास यांनी यावेळी सांगितले की, "आमचा ट्विटरवरील प्रवास सध्या अचानक थांबला आहे." यावर प्रतिक्रिया देताना शिक्षिका डॉ इंदू विश्वनाथन यांनीदेखील खंत व्यक्त करत हे अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, "हिंदुंचा अनुभव लोकांसोबत शेअर करणे, ही हिंसा आहे का? हिंदूंचे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हे अटी - शर्थीसह येते का?" असा प्रश्न विचारला आहे.
 
 
 
 
यावेळी डॉ इंदू विश्वनाथन यांनी ट्विटर आणि ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनाही टॅग केले आहे. लोकांनी याबद्दल म्हंटले आहे की, 'हे हँडल सतत बंगाली हिंदूंसाठी आवाज उठवत असतात, यामुळे ट्विटरने ही कारवाई केली आहे. काहींनी म्हंटले आहे की, हे हँडल संवेदनशीलपणे आणि प्रामाणिकपणे हिंदूंसाठी काम करत होते, जे काहींना रुचले नाही.
 
 
एकीकडे हिंदुंवर होणारे हल्ले हे काही माध्यमे लपवत असतानाच 'इस्कॉन बांग्लादेश' आणि 'बांगलादेश हिंदू एकता परिषद' हे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली. हे दोघेही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि हिंसक हल्ल्यांच्या बातम्या जगासमोर घेऊन येत होते. एकीकडे मुस्लिम जमाव हिंदू अल्पसंख्याकांना त्रास देत होता, तर दुसरीकडे ट्विटर त्यांना ऑनलाइन बोलू देत नव्हते. हिंदूंवरील अत्याचार आणि हिंसक हल्ल्यांसाठी न्यायाची मागणी करणाऱ्या काही हँडल्सवर अशा कारवाया होत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0