बंगळूरमध्ये झालेल्या महाराजांच्या मूर्तीची विटंबना निषेधार्ह : खासदार संभाजीराजे

18 Dec 2021 13:01:12

Sambhaji Raje_1 &nbs
 
 
मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बंगळुरूमध्ये घडलेल्या या प्रकाराचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटण्यास सुरुवात झाली आहे. या वृत्ताने शिवप्रेमी आक्रमक झाले आणि बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौकात एकत्र येत आंदोलन केले. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी याबद्दल संताप व्यक्त केला असून खासदार संभाजी राजे भोसले यांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.
 
 
 
खासदार संभाजी राजे भोसले यांनी म्हंटले आहे की, "संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी." अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच, हे वृत्त मिळताच सांगलीतील मिरजमध्ये संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटक राज्याच्या बसेस आणि खाजगी वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली. तसेच, शहरातल्या कन्नड व्यवसायिकांच्या आस्थापनांवर हल्लाबोल करत दुकाने बंद पाडली.
 
Powered By Sangraha 9.0