IPL 2022 : गौतम गंभीर बनणार नव्या लखनौ संघाचा मार्गदर्शक

18 Dec 2021 15:34:12

Gambhir_1  H x
 
 
मुंबई : आयपीएल २०२२च्या पर्वाच्या आता अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. लवकरच मेगा लिलावदेखील सुरु होणार आहे. आयपीएलच्या इतर ८ संघांप्रमाणेच आता यात आणखीन २ नवे संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे मेगा लिलावदेखील रंजक होणार आहे. आता हळूहळू सर्व संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. नवख्या लखनौ संघाने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना संघाचे मालक संजीव गोयंका यांनीच यासंदर्भात माहिती दिली.
 
 
आयपीएलमध्ये गौतम गंभीर हा पहिल्यांदाच मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहे. याचसोबत लखनौ संघाने मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि अँडी फ्लॉवर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, के. एल. राहुलला संघात स्थान देत कर्णधारपददेखील त्याच्याकडे सोपवण्यात येणार असल्यची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना संघाचे मालक संजीव गोयंका यांना यासंबधी प्रश्न विचारला असता म्हणाले, "हो, आम्ही गौतम गंभीरला संघात मार्गदर्शक म्हणून सहभागी करून घेतले आहे," यानंतर गंभीरनेदेखील ट्विट करत त्यांचे आभार मानले.
 
 
 
 
 
गंभीरने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "स्पर्धेत पुन्हा उतरणे हा एक विशेषाधिकार आहे. लखनौ आयपीएल संघासाठी मला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केल्याबद्दल डॉ. संजीव गोयंका यांचे खूप आभार. अजूनही जिंकण्याची आग माझ्यामध्ये धगधगत आहे. विजयाची उम्मेद अजूनही मला जागे करते. मी फक्त संघासाठी खेळणार नाही तर उत्तर प्रदेशच्या अभिमानासाठी आणि आत्म्यासाठी खेळेन."
 
 
Powered By Sangraha 9.0