लसीकरण वाढविण्यासाठी पालिकेचा निर्णय

15 Dec 2021 00:37:02
 
vaccine-8_1  H
 
 
 
मुंबई : राज्यासह मुंबईतील वाढत्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या आणि इतर बाबींचे गांभीर्य पाहता मुंबई महापालिका प्रशासनातर्फ़े मुंबईकरांच्या लसीकरणाबाबत एक निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील लसावंतांची संख्या वाढविण्यासाठी मुंबईमध्ये लवकरच संध्याकाळच्या टप्प्यात लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. संध्याकाळी पाच ते रात्री अकरा या कालावधीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून ही लसीकरण केंद्रे मुख्यत्वे रेल्वे स्थानक परिसरात उभारली जातील. सद्यस्थितीत ही लसीकरण केंद्रे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहेत.
 
 
देशभरात झालेल्या विक्रमी लसीकरणांनंतर बाकी राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सरकारतर्फे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुंबईत रात्रीच्या वेळीचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात सध्या अशी किमान दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0