२०३० पर्यंत गगनयान पाठवण्याची योजना : राज्यमंत्री जितेंद्र सिंह

13 Dec 2021 13:47:57

isro_1  H x W:



 नवी दिल्ली : सरकारने गुरुवारी सांगितले की भारत २०३० पर्यंत एक अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली.जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताची २०२३ पर्यंत गगनयान पाठवण्याची योजना आहे आणि त्यापूर्वी पहिल्या दोन मानवरहित मोहिमा पाठवल्या जातील. त्यांच्या रोबोटिक मिशनचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्यापैकी एक पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाठवण्यात येईल आणि दुसरे मिशन वर्षाच्या अखेरीस पाठवण्याची योजना आहे.

 
जितेंद्र सिंह म्हणाले की, गगनयानच्या यशामुळे अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत हा चौथा देश बनेल आणि अंतराळ क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांपैकी एक असेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) च्या यशाचा संदर्भ देत ते म्हणाले की, गगनयानासोबतच व्हीनस मिशन, सोलर मिशन (आदित्य) आणि चांद्रयानसाठी काम सुरू आहे. ते म्हणाले की कोविड महामारीमुळे विविध मोहिमांना विलंब झाला आणि पुढील वर्षी चांद्रयान पाठवण्याची योजना आहे.



 
सिंग म्हणाले की, भारत सरकारने मंजूर केलेल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमाचे नाव गगनयान कार्यक्रम आहे. मानवांना लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये पाठवण्याची आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याची भारतीय लाँचर रॉकेटची क्षमता प्रदर्शित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ते म्हणाले की, इस्रोने आतापर्यंत ३४ देशांचे ४२ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यामुळे देशाला ५६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे परकीय चलन मिळाले आहे.


 
Powered By Sangraha 9.0