मुंबईत २५६ कोरोनाबाधितांची नोंद

12 Dec 2021 00:46:39
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शनिवार, दि. ११ डिसेंबर रोजी मुंबई शहरात २५६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७,४४,३७० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
 
सुदैवाने शनिवारी मुंबईत एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद न झाल्याने एकूण मृत्युसंख्येत कुठलीही वाढ झालेली नाही. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १,८०८ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २,५९२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. शहरातील एकूण ११ इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
मुंबईत झालेल्या एकूण चाचण्या - १,२८,४५,६८६
११ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या चाचण्या - ४४,३८०
 
 
Powered By Sangraha 9.0