मुंबईत १९२ कोरोनाबाधितांची नोंद

11 Dec 2021 08:34:14
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी मुंबई शहरात १९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७४४१४९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर शहरातील एकूण मृतांची संख्या १६,३५५ झाली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १,७७३ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २,६०३ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. शहरातील एकूण ११ इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
मुंबईत झालेल्या एकूण चाचण्या - १,२८,०१,४०६
१० डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या चाचण्या - ३६,५१५
 
 
 
Powered By Sangraha 9.0