मध्य रेल्वे विस्कळीत; ठाण्याजवळ रेल्वेमार्ग खचला

01 Dec 2021 11:46:47
railway _1  H x


ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान जलद रेल्वेमार्गातील खडी खचल्याने बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडुन ठाणे स्थानकात येणाऱ्या जलद लोकल मेल एक्सप्रेसचा खोळंबा झाला.


फलाट क्रमांक पाचवरील लांबपल्याच्या गाड्या फलाट क्रमांक सातवर वळवण्यात आल्या.तर ,जलद लोकल फलाट क्रमांक दोनवरून वळवण्यात आल्याने उपनगरी गाड्या ७ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. लांबपल्याच्या गाड्या वळवल्याने बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाश्यांची तारांबळ उडाली. सामानसुमानारह कुटुंब काबिल्याला नेण्यात चाकरमान्यांची धावपळ उडाली."ट्रॅक पॅकिंग" (रेल्वे पटरी दबल्याने) झाल्याने डेक्कन एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस फलाट क्रमांक ५ ऐवजी फलाट क्रमाक ७ वरून वळवल्याचे रेल्वे कर्मचार्‍यानी सांगितले.
Powered By Sangraha 9.0