भोपाळ : शिवसेनेच्या तिकीटावर २०१५ मध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या अनुपमा तिवारी हिच्या मध्य प्रदेशातील सिहोरच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफार्श झाला आहे. पोलीसांनी तिच्या घरातून पैसे जप्त केले आहेत. स्वतःला राजकारणी, पत्रकार, आरटीआय कार्यकर्ती, सामाजिक कार्यकर्ती आणि योगाचार्य म्हणवत होती. एक चेहरा आणि सहा वेगवेगळ्या ओळख असलेल्या या महिलेची पोलखोल पोलीसांनी उघड केली आहे.
मध्य प्रदेशातील पोलिसांना अनुपमा तिवारी चालवत असलेल्या सेक्स रॅकेटची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस सिहोर बस स्थानकानजीकच्या अनुपमाच्या घरी पोहोचले. या छाप्यादरम्यान त्या ठिकाणी सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी टाकलेल्या धाडीदरम्यान कुणीही पळून गेलेले नाही.
स्वतःला शिवसेना नेत्या म्हणविणाऱ्या या अनुपमा तिवारीच्या घरातून पोलिसांनी चार मुली आणि तीन ग्राहकांना अटक केली. तसेच काही अंमवी पदार्थांसह रोख रक्कम जप्त केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व मुली भोपाळ नजीक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदुलता नावाच्या महिला मॅनेजर सर्व मुलींना शिवसेना नेत्याच्या घरी पोहचवत होती.
या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी पोलिसांनी अनुपमा तिवारी यांच्या घरातून २८ हजार रुपयांसह दोन कारही जप्त केल्या आहेत. अनुपमा तिवारी यांनी २०१५मध्ये शिवसेना तिकिटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. नेहरू युवा केंद्रातर्फे त्यांना काही वर्षांपूर्वी योगाचार्य म्हणून गौरविण्यातही आले आहे. अनुपमा यांनी एका कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक विधाने केली होती. त्यांनी महिलेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र आता त्याच्या घरातून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाली आहे.