मुंबईत 210 कोरोनाबाधितांची नोंद

09 Nov 2021 13:07:43
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सोमवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी मुंबई शहरात 210 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 317 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७३६२७१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
 
सोमवारी मुंबईत 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २८१५ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २१५४ दिवसांवर गेला आहे. शहरातील एकूण 13 इमारती पालिका प्रशासनातर्फे सीलबंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0