१८ हजार ३०० कोटींचा PAYTMचा IPO घोषित

    08-Nov-2021
Total Views |

PAYTM _1  H x W 
 
 
मुंबई : भारतीय ऑनलाईन व्यापार कंपन्यांतील सर्वात मोठा IPO सोमवारी शेअर बाजारात उतरला. पेटीएमनंही शेअर बाजारात आपली घोडदौड सुरू केली आहे. या कंपनीचा IPO १८,३०० कोटींचा आहे. खेड्यापाड्यांपासून मोठ्या शहरांमध्ये आणि टपरी पासून ते थेट सुपरमार्केटमध्ये आपण पेटीएम चे QR कोड स्टिकर पहिले असतील. भांडवली बाजारात उतरलेल्या पेटीएमची कहाणी कशी आहे? याबद्दल घेतलेला हा थोडक्यात आढावा... 

 
११ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पेटीएमची सुरवात विजय शेखर शर्मा या तरुणाने केली. पेटीएमच्या स्थापनेची गोष्ट फार प्रेरणादायी मानली जाते. विजयचा जन्म अलिगढच्या विजयगड गावात झाला. वयाच्या १४व्या वर्षीच त्याने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. दिल्ली मध्ये इंजिनेरींग करत असताना, त्याला इंग्रजी भाषेमुळे अभ्यास समजेना झाला. तो तिसऱ्या सेमिस्टर मध्ये नापास झाला आणि शेवटच्या सेमिस्टरमध्ये दोन विषय बॅकलॉग मध्ये राहिले. तरीही त्याने इंजिनिअरींग पूर्ण केली. 
कॉलेजमध्ये असतानाच त्याने ४ मित्रांसोबत इंटरनेट कंटेन्ट सर्च करणारी 'One97' नावाची कंपनी सुरू केली. वर्षभराने नफा कमवत विकली. २००९ मध्ये कंपनी बोर्डासमोर त्याने 'पेटीएम'ची संकल्पना मांडली. 'डिजिटल पेमेंटच भारतात मार्केट नाही' अस सांगून त्याला नकार दिला गेला. विजयने त्याचे २० लाख डॉलरचे शेअर टेबलावर ठेवले. तो म्हणाले, "कंपनी बुडाली तर माझे सगळे पैसे तुमचे." आणि पेटीएमची स्थापना झाली.
 


२०१० साली पेटीएम कंपनीची सुरवात झाली. २०१६ मध्ये नोटबंदी झाली आणि कंपनीला २५० टक्क्यांची वाढ मिळाली. २०१८ मध्ये पेटीएम ची सर्व्हिस जपान मध्ये सुरु झाली. २०१९ च्या लोकडाऊन मध्ये कंपनीने १ बिलियन डॉलरचा टप्पा पार केला. आणि आज २०२१ मध्ये पेटीएम भारतातील सर्वात मोठा IPO ठरली आहे. सध्यस्थितीला पेटीएमची किंमत १.१ लाख करोड इतकी आहे. ३५ करोड लोक पेटीएम वापरतात.