'गगन सदन तेजोमय' दिवाळीपहाट संपन्न

    दिनांक  08-Nov-2021 13:41:43
|

ग्रंथाली _1  Hमुंबई
: 'गगन सदन तेजोमय' हा दिवाळी पहाट कार्यक्रमाचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे यंदाचे हे १७वे वर्ष होते. परंपरेनुसार यंदाही संस्थेतर्फे ध्यास सन्मान प्रदान करण्यात आला. प्रसिद्धी परान्मुख अशा समाजसेवक आणि संस्थांना हा सन्मान पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार नाना पालकर स्मृती समिती या मुंबईतील परळच्या संस्थेला प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये रोख रक्कम आणि सोनसाफ्याची परडी आणि दिवा, असे या सन्मानाचे स्वरुप आहे.
 


रुग्णसेवा म्हणजेच ईश्वरसेवा हे या संस्थेचे ब्रीद आहे. नाना पालकर स्मृती समितीच्या कार्याला कृतज्ञपूर्वक वंदन म्हणून ध्यास सन्मान प्रदान करण्यात आल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. ॲड.संजीव सावंत आणि डॉ. नीना सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार संस्थेतर्फे डॉ. जयंतराव पटवर्धन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.