
पुणे : पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचे काम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पुणे मेट्रोच्या एकूण ३ मार्गिका असणार आहेत. त्यातील पहिल्या दोन मार्गिकांचे काम ( पिपरी-चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी) ''महामेट्रो'' बघणार आहे, तर पुणे मेट्रो प्रकल्पातील तिसऱ्या मार्गाचे काम ''पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'' (पीएमआरडीए) बघणार आहे. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाकरता लागणाऱ्या जमिनीच्या हस्तांतराचे काम नुकतेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) उभारण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या जमिनी 'पीएमआरडीए'कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. ह्या भूसंपादनामुळे पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे प्रत्यक्ष काम करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
हिंजेवाडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाची लांबी २३.३ किमी असून त्यावर २३ मेट्रो स्थनाके असणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींपैकी काही जमिनी काही वर्षांपूर्वी हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. तर केंद्र सरकारच्या जमिनी ताब्यात देण्यापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाकडून कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होणे बाकी होते. ती प्रक्रिया आता पूर्ण झाली असल्याने या जमिनी 'पीएमआरडीए'कडे हस्तांतरित केल्या असल्याची माहिती पूण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे . पुणे मेट्रोच्या ह्या तिसऱ्या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी विलंब होत होता त्यामुळे जमिन हस्तांतरणाच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी या बाबतची सर्व कार्यवाही करण्याचे अधिकार पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची प्रकिया पूर्ण करण्यात आली आहे. या बाबतची माहिती देताना पुणे जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुख म्हणाले कि, '' 'केंद्र सरकारच्या जमिनींपैकी शिवाजीनगर (भांबुर्डा) येथील आकाशवाणी केंद्र आणि हवामान विभागाची ६६४.८३ चौरस मीटर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) ३७६.०५ चौरस मीटर, केंद्रीय बीज संशोधन प्रशिक्षण संस्थेची २९०.८९ चौरस मीटर अशा सुमारे १५४०.४१ चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे.
या जमिनी आता 'पीएमआरडीए'च्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाच्या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि अन्य खासगी संस्थांच्या ताब्यात असलेल्या जमिनींपैकी औंधमधील टायग्रीस कॅम्प, पुणे ग्रामीण पोलिस, राजभवन, शासकीय तंत्रनिकेतन विभाग, पोलिस भरती मैदान, शिवाजीनगर भागातील शासकीय तंत्रशिक्षण विभाग, पोलिस कवायत मैदान, पोलिस मनोरंजन केंद्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) वसतिगृह, न्यायालय, कृषी महाविद्यालय अशी सुमारे १५ हजार ७९१ चौरस मीटर जमीन यापूर्वीच पीएमआरडीए कडे हस्तांतरित झाली आहे. नुकत्याच भूसंपादन झालेल्या जमिनींपैकी काही जमीन ही मेट्रो स्थानकांसाठी; तर काही खासगी कंपन्यांना देऊन निधी उभारण्याचे नियोजन असल्याचे पुणे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या बद्दल अधिक माहिती देताना पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले कि, '' शिवाजीनगर ते हिंजवडी या पुणे मेट्रोच्या तिसरऱ्या मार्गावर केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनी आहेत. त्यातील आवश्यक असलेल्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून ;त्यामुळे या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू करता येणार आहे.