पुण्यात ८७ महिला नगरसेविका निवडून येणार

07 Nov 2021 20:11:42

पुणे महापालिका _1 &n
 
 
 

पुणे : २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेच्या सभागृहात कमीत कमी ८७ नगरसेविका प्रवेश करणार आहेत. विविध प्रकारचे जातीय आरक्षण आणि महिलांसाठीचे असणारे ५०% आरक्षण मिळून काही महिन्यांनी पुणे महानगरपालिकेत कमीत कमी ८७ महिला नगरसेवक निवडून येणार आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातून पण विविध राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांना संधी मिळाल्यास पुणे महानगरपालिकेत महिला नगरसेवकांची संख्या ही ८७ पेक्षा अधिक होऊ शकते.

त्यामुळे पुणे महानगरपालिकेत २०२२ फेब्रुवारी नंतर पुरुष नागरसेवकांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या जास्त असणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुण्यात २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत एकूण ५८ प्रभाग होणार असून नगरसेवकांची संख्या १७३ असणार आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक ही त्रिसदस्यीय होणार आहे. एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडले जाणारे आहेत. त्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आरक्षणासह महिलांना ५०% आरक्षण मिळणार आहे. मध्यंतरी राज्यातील महापालिकांमध्ये एकूण नगरसेवकांच्या संख्येत १५% ने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे पुणे महानगरपालिकेत आगामी निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ९ ने वाढणार आहे.

पुण्यात १७३ नगरसेवकांसाठी ५८ प्रभाग असणार आहेत. ह्या ५८ पैकी ५७ प्रभागात त्रिसदस्यीय निवडणूक होईल तर एका प्रभागात २ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महिलांना असलेल्या ५०% आरक्षणानुसार १७३ पैकी ८७ जागा ह्या महिलांसाठी राखीव असणार आहेत. महिलांसाठी राखीव असणाऱ्या ८७ जागांपैकी १२ जागा अनुसूचित जातींसाठी, एक जागा अनुसूचित जमातीसाठी, मागासवर्गीय जातींसाठी २४ जागा तर उरलेल्यास ५० जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असतील. पुणे मनगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार ८२४ एवढी निश्चित केली गेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एका प्रभागात ५५ ते ६० हजार मतदार असू शकतात.

 
Powered By Sangraha 9.0