मुंबईत 'या' ठिकाणी पहा दिवाळी किल्ले

    दिनांक  06-Nov-2021 12:05:11
|
  
Fort_1  H x W:
 
 
 
मुंबई: दिवाळी म्हटले कि कंदील, फराळ, रोषणाई हे सारे आले. त्यात दिवाळी किल्ला असेल तर आपला आनंद द्विगुणित होतो. गावाकडे दिवाळी किल्ले मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. मुंबईतही काही भागात दिवाळी किल्ले तितक्याच उत्साहात साकारले जातात. आज सफर करूया टोलेजंग इमारतींच्या मुंबईतल्या दिवाळी किल्ल्यांची. 
 
१. पद्मदुर्ग (भांडुप)
 
 
padmadurg _1  H
 
 
उमेश मित्र मंडळ, भांडुप (गाव) यांनी यंदा पद्मदुर्ग साकारला आहे. किल्ले मुरुड जंजिरा जवळ पद्मदुर्ग आहे. हि प्रतिकृती पाण्यात साकारल्यामुळे एखाद्या खऱ्या जलदुर्गाप्रमाणे दिसते. 
 
२. रायगड (वडाळा)
 
 
raigad_1  H x W 
 
'शिवबांचे मावळे, वडाळा -३१' हे मंडळ गेली ५ वर्ष मुंबईत दिवाळी किल्ले साकारत आहेत. यंदा त्यांनी शिवछत्रपतींची राजधानी किल्ले रायगड साकारले आहे. 
 
३. प्रतापगड (साई नगर, भांडुप)
 
 
pratapgad_1  H  
भांडुपच्या साई नगर वस्तीत यंदा प्रतापगड साकारला आहे. दिवाळीच हे विशेष आकर्षण आहे. या दिवाळी किल्ल्यात नैसर्गिक रित्या गवत उगवली आहे.   
 
४. अवचितगड (कांजूरमार्ग)
 
 
avchitgad_1  H  
कार्जूरमार्गच्या सत्यम शिवम सुंदरम सोसायटी मध्ये अवचितगड साकारला गेला आहे. या दिवाळी किल्ल्यात छत्रपती शिवरायांची मूर्ती शोभून दिसते. 'फ्लॅट सिस्टीम मध्ये साकारलेला मातीचा किल्ला' हे नवल!
 
५. लोहगड (भांडुप)
 
 
lohgad_1  H x W 
लोहगडाची हुबेहूब प्रतिकृती पाहायची असल्यास भांडुपच्या फ्रेंड्स कॉलनी मध्ये जावं. इथल्या 'बिनधास्त बॉयस' मंडळाने हा दिवाळी किल्ला साकारला आहे. 
 
६. प्रतापगड (डिलाईल रोड, चिंचपोकळी)
 
 
pratapgad_1  H  
 
 
ना. म. जोशी मार्ग (डिलाईल रोड) इथल्या मंगल मूर्ती सोसायटी मध्ये प्रतापगड साकारण्यात आला आहे. अगदी साधी याची ठेवण आहे. गिरणी कामगार वस्तीत हा किल्ला तयार करण्यात आला आहे.
 
७. कनाकिया झेन वर्ल्ड (कांजूरमार्ग)
 
 
kanakia _1  H x 
 
'टाकाऊपासून टिकाऊ' या संकल्पनेवर कनाकिया झेन वर्ल्ड (स्टेशन रोड, कांजूरमार्ग- पूर्व) येथे पहिल्यांदाच दिवाळी किल्ला साकारला गेला आहे. यात किल्ला, जलदुर्ग, वाडा, आणि गढी या साऱ्यांचा अंश पहायला मिळतो. यातील शिवछत्रपतींची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.
 
८. अजिंक्यतारा (आशीर्वाद निवास, कांजूरमार्ग)
 
 
ajinkyatara_1   
सातारा शहरातल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा देखावा आशीर्वाद निवास मध्ये साकारला गेला आहे. या किल्ल्यावर अनेक मावळे वावरताना दिसतात.  
 
 
९. लोहगड (जुनिअर स्टार क्रिकेट क्लब, भांडुप)
 
 
lohgad_1  H x W 
जुनिअर स्टार क्रिकेट क्लब, भांडुप यांनी लोहगड साकारला आहे. हा देखावा एखाद्या अस्सल दिवाळी किल्ल्याप्रमाणे शोभतो. 
 
१०. विजयदुर्ग (कांजूरमार्ग)
 
 
vijaydurg_1  H
 
 
गणेश वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- कांजुरमार्ग(पूर्व) यांनी यंदा जलदुर्ग साकारला आहे. मालवण किनाऱ्यावरील किल्ला विजयदुर्ग त्यांनी तयार केला आहे. 
 
११. राजगड (काळाचौकी)
 
rajgad _1  H x  
 
 काळाचौकी येथील चैत्रबन सोसायटी (अभ्युदय नगर इमारत १२) येथे भव्य राजगडाची प्रतिकृती साकारली गेली आहे.
  
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.