IPL 2022 लिलाव : पंजाब संघ ठरणार डोकेदुखी? वाचा सविस्तर

30 Nov 2021 13:28:23

IPL 2022_1  H x
मुंबई : आयपीएल २०२२ स्पर्धेचे वेध आता सर्वांना लागले आहे. लवकरच यासंदर्भातील लिलाव सुरु होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या ८ पैकी ७ संघांनी नवीन पर्वासाठी आपले खेळाडू कायम ठेवले आहेत. पंजाब किंग्सने आपल्या कोणत्याही जुन्या खेळाडूला कायम ठेवलेले नाही, अशी माहिती त्यांच्या अहवालात असल्याचे सांगण्यात आले आहे. ही फ्रँचायझी संपूर्ण ९० कोटी रुपयांच्या खेळाडूंच्या मेगा लिलावाचा भाग असेल. त्यामुळे प्रीती झिंटाचा हा संघ लिलावादिवशी इतर फ्रँचायझीसाठी डोकेदुखी ठरण्याचे संकेत आहेत. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
 
अशी आहे संभाव्य यादी :
चेन्नई सुपर किंग्ज - रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली
कोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर
सनरायझर्स हैदराबाद - केन विल्यमसन
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल
दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टया
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
Powered By Sangraha 9.0