आयपीएल २०२२ : राहुल- राशीदवर बंदीची टांगती तलवार?

30 Nov 2021 18:51:15

IPL _1  H x W:
मुंबई : एकीकडे आयपीएल २०२२च्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अनेक संघांनी खेळाडूंना रिटेन केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे आयपीएलचे सर्वोत्तम फलंदाज के. एल. राहुल आणि सर्वोत्तम गोलंदाज राशीद खान यांच्यावर बंदी टांगती तलवार लटकत असल्यचे सांगण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे, लखनौ या नवख्या संघासोबत आगामी स्पर्धेत संघात समावेश करून घेण्यासाठी या दोघांची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्सने बीसीसीआयकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
पंजाब किंगचा राहुल आणि सनरायजर्स हैदराबादच्या राशीद खानला लखनौ संघाकडून ऑफर आल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात होत आहे. आयपीएलच्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला लिलावाआधी आपल्या रकमेबाबत दुसऱ्या संघासोबत व्यवहार किंवा चर्चा करायला परवानी नाही. याच कारणामुळे आयपीएल २०१० पूर्वी रविंद्र जडेजाचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे आता अशी कारवाई या दोघांवरही होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0