आता संपूर्ण समर्थ साहित्य एकाच ठिकाणी!

26 Nov 2021 16:34:27

Samarth _1  H x
मुंबई : समर्थ रामदासस्वामींवर प्रकाशित साहित्य एकाच ठिकाणी वाचणे शक्य व्हावे यासाठी सुमंगल प्रकाशनातर्फे 'समग्र समर्थ साहित्य' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहे. पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या वाचकांच्या पसंतीनंतर आता प्रकाशकांनी सुधारित दुसरी आवृत्तीही वाचकांच्या भेटीला आणली आहे. सुधारित आवृत्ती असलेल्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, ग्रंथाच्या शेवटी सामाविष्ट करण्यात आलेल्या परिशिष्टांमध्ये ग्रंथातील ओव्या, अकारानुक्रमे देण्यात आल्याची माहिती, संपादक प्रकाशक जयराज साळगावकर यांनी दिली.
 

ते म्हणाले, "रामदासस्वामींच्या साहित्याचे अभ्यासक-संशोधक यांच्यासाठी ही सुधारित आवृत्ती उपयुक्त ठरेल. १९९९पासून नागपूर विद्यापीठाच्या डॉ. मधुकर रामदास जोशी यांनी संशोधन करून या ग्रंथाचे संकलन व संपादन केले आहे. १९९८ मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ आता २३ वर्षांनंतर 'कालनिर्णय'च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नुकताच पुर्नप्रकाशित केला आहे."
 
पुस्तकाचे नाव - समग्र समर्थ साहित्य
 
लेखक - डॉ. मधुकर रामदास जोशी
 
प्रकाशक - कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन
 
पृष्ठे - १२७१ (पुठ्ठाबांधणी)
 
मूल्य - २ हजार रुपये









Powered By Sangraha 9.0