मुंबईकर श्रेयस अय्यरचे शतकी पदार्पण

26 Nov 2021 13:41:00

Shreyas Iyer_1  
नवी दिल्ली : कानपूर येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने सर्वबाद ३४५ अशा धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजांनी संयमी खेळी करताना एक सन्मानार्थ लक्ष न्यूझीलंडच्या संघासमोर ठेवले आहे. यावेळी मुंबईकर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी करत पदार्पणात शतकी खेळी करण्याचा विक्रम केला आहे. श्रेयसने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये देशाचे नेतृत्व केले आहे. पण कसोटी खेळण्याची संधी मिळण्यासाठी त्याला ४ वर्ष वाट पाहावी लागली. या सामन्यात शतक झळकावून त्याने एक स्वप्नवत पदार्पण केले आहे. अशी कामगिरी करणारा तो १६वा भारतीय खेळाडू ठरला.
 
पहिल्या दिवसाखेर श्रेयसने रवींद्र जडेजाच्या साथीने शतकी भागीदारी करत भारतीय संघाला २५०चा आकडा पार करून दिला. तर न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पहिल्या दिवशी श्रेयसने नाबाद ७५ धावा केल्या होत्या. दुसऱ्यादिवशी तो शतकी वाटचाल करेल अशी अपेक्षा होती. त्याने १५७ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. कानपूरच्या मैदानावर शतक झळकवणारा तो गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला.
Powered By Sangraha 9.0