26-11 : काँग्रेसी अन् बॉलीवुड लिबरलांनी केली होती हिंदू टेररची भाषा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2021
Total Views |

Salman _1  H x

मुंबई हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही मुंबई हल्ल्याच्या भळभळत्या जखमा कुणी विसरू शकलेलं नाही. इस्लामिक कट्टरतावादाला मूळापासून उघडून टाकण्याऐवजी पाकिस्तानशी थेट बदला घेण्याऐवजी तत्कालीन काँग्रेस सरकार आणि बॉलीवुडमधील महेश भट्ट सारखे लिबरल आपली पोळी भाजून घेण्यासाठी पुढे होते. पाकिस्तानला जरब बसली नाहीच. शिवाय पाक सरकारच्या नाकाखाली सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांचा नंगा नाच पाहण्याशिवाय भारतीयांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता.
 
 
अशातच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी तर या सगळ्याचा कळसच गाठला. 'हिंदू टेरर' ही संगल्पना मांडताना त्यांनी २६-११ चा हल्ला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षडयंत्र असल्याचे पुस्तकच छापले. दिग्विजय सिंहांनी लांगुलचालन करण्याची सीमा तेव्हा ओलांडली जेव्हा त्यांनी पाकिस्तानला २६-११च्या हल्ल्यात क्लीन चीट देऊन टाकली होती. पाकिस्तानातील कुठल्याही दहशतवाद्याचा मुंबई हल्ल्यात हात नव्हता, असे म्हणत त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला होता.
 
 
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी तर राजकारण करण्याची संधी सोडली नाही. मुंबईतील १६६ कुटूंबांनी आपल्या हक्काची माणसं गमावली होती. तरीही त्यावेळी विरोधी पक्षांवर आणि संघावर आसूड ओडण्याचे काम करून पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्याला खुलेआम क्लीन चीट देऊन मोकळे झाले होते. ही सगळी शर्यत सुरू असताना मागे राहतील ते बॉलीवुडचे महेश भट्ट कसले. हिंदूविरोधी गरळ ओकण्याची विकृती जणूकाही अंगात मुरली असल्याने त्यानी रा.स्व.संघ विरोधी पुस्तक लिहीणाऱ्या महेश भट्ट यांना क्रांतीकारी म्हणून टाकले. असे म्हणत त्यांनी केवळ क्रांतीकारकांचा अवमानच नाही तर मुंबई हल्ल्यातील पीडितांची क्रूर थट्टाही केली.
 
 
पाकिस्तानच्या या नापाक कारवाईचा बदला घ्या, असे वारंवार जीव तोडून प्रत्येक मुंबईकर आणि देशाचा नागरिक सांगत होता. त्यावेळी पाकिस्तान सरकार कसे निर्दोष आहे, हे सांगण्यात बॉलीवुडकर मग्न होते. सलमान खान एका मुलाखतीत म्हणतो, "हा एक दहशतवादी हल्ला होता. पाकिस्तान सरकारचा त्यात काय दोष. दोष तर आपल्या सरकारी यंत्रणाचा आहे, सुरक्षा यंत्रणांचा आहे." मुक्ताफळे उधळताना सलमानला दहशदवादी हल्लात भारताच्या निरपराध प्राणांची आहुती देणाऱ्यांबद्दल काहीच वाटत नाही. दोष पाकिस्तान सरकारचा नाहीच, असे म्हणून तो क्लीन चीट देत राहतो.



@@AUTHORINFO_V1@@