'मेरा यशू यशू' वाला पादरीला पंजाब काँग्रेसचे बळ ? सुरू करतोय नवी ब्रांच!

CM चन्नी, सोनू सूदसह बड्या व्यक्तीमत्वांच्या उपस्थितीत होतोय कार्यक्रम!

    दिनांक  25-Nov-2021 15:34:09
|
pUNJHAB _1  H x
चंडीगड : ‘मेरा यशु यशु’ गाण्यातून व्हायरल झालेला मीम आपण पाहिला असेलच. मुलगी मुकी होती ती आता बोलू लागली, असे ढोंग रचणाऱ्या वादग्रस्त पादरी बजिंदर सिंहने पुन्हा एकदा आपल्या करामती सुरू करण्यासाठी काँग्रेसशासित राज्यात नवी जागा शोधली आहे. बुधवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर त्याचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलद्वारे त्याने पंजाबच्या मोगा या नव्या जागेत शाखा सुरू करणार असल्याचे सांगत जाहिरातबाजी केली आहे.
 
 
 
तो म्हणतो, "तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की, ‘प्रोफेट बजिंदर सिंह मिनिस्ट्री’ यांची ब्रांन्च आता पंजाबच्या मोगामध्ये खुली होत आहे. याचा दिमाखदार सोहळा २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त विशाल सत्संग केला जाणार आहे. ईथे येऊन परमेश्वराचे दास बजिंदर सिंह यांच्याद्वारे अंधांना दृष्टी मिळते. लंगडे चालू लागतात. दुष्ट आत्म्यांना सुटका मिळते. आजारी लोक चालू लागतात." मुख्य अतिथी कोण असणार याबद्दल या व्हीडिओमध्ये कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या पत्रकांनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस आमदार हरजोत कमल, अभिनेता सोनू सूद आणि त्यांची बहिण मालविका सूद हीचेही नाव लिहीण्यात आले आहे. मालविका पंजाबच्या मोगा विधानसभा मतदार संघातूनच विधानसभा लढविणार आहेत.
 
 
 
निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याबद्दल टीका झाली. बजिंदर सिंहवर भ्रामक आणि खोट्या पद्धतीने लोकांना भूलवण्याचा आणि धर्मांतरणाचा आरोप आहे. अशातच आता याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न पंजाब काँग्रेस आणि मुख्यमंत्री करत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. लेखक रतन शारदा यांनी याबद्दलची निमंत्रण पत्रिका ट्विट करत प्रश्न विचारला आहे. “काँग्रेसच्या मुख्यमंत्री, पक्ष याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. एसजीपीसी अमृतसर, सुखबीर सिंह बादल आणि अकाली दल याबद्दल तुमचं मत काय?, सिख-हिंदू एकोप्याचा आदर्श पुढे ठेवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काँग्रेसी घृणा करतात मात्र, पंजाबमध्ये भरदिवसा धर्मांतरणाचा खेळ सुरू असताना हे गप्प कसू शकतात?, बजिंदर आता प्रोफेट बनला आहे आणि मुख्यमंत्री सीएम चन्नी त्यांचे शिष्य?", असे म्हणत त्यांनी या प्रकारावर तीव्र टीका केली आहे.
 
 
 
पत्रकार विजय पटेल यांनीही याबद्दल जाब विचारला आहे. ”हा बजिंदर कोरोनावर उपाय का करत नाही?, पाहुण्यांची यादी तर पहा! पंजाबचे मुख्यमंत्री आणि सोनू सूदही या यादीत सामाविष्ट आहेत." दरम्यान, पादरी बजिंदर सिंह याचे नाव यापूर्वी हत्या आणि बलात्कार प्रकरणातही त्याचे नाव आले आहे. तीन वर्षांपूर्वी त्याला पोलीसांनी बलात्कार प्रकरणात जीरकपुर पोलीसांनी अटक केली होती. त्याच्यावर चमत्कार दाखवून उपचार करण्याचे आणि पैसे लुबाडण्याचेही आरोप आहेत. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (NCPCR) यांच्यातर्फे पोलीसांनी ऑगस्ट २०२१मध्ये पॉक्सो नियमांअंतर्गत बजिंदर सिंह विरोधात गुन्हा दाखल केलाी होता. सोशल मीडियावर जबरदस्ती धर्मांतरण करण्याचा त्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता.
 
 
 
‘हीलर बाबा’ नावाने प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध बजिंदर सिंह याचे YouTube वर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने सोशल मीडियावर विविध प्रकारचे आजार बरे करण्याचा दावा केला आहे. कुठलाही आजार असुद्या क्षणात दूर करतो, असा फसवा दावा तो वारंवार करत असतो. त्याच्या यूट्यूब चॅनलवर अशाप्रकारच्या घटनांचे व्हीडिओ उपलब्ध आहेत. त्याच्या कार्यक्रमात ना कोरोना नियमावलींचे पालन केले जात नाही हे स्पष्ट दिसून येते. सरकार आणि स्थानिकांचा विरोध असतानाही धर्मांतरणाचा वेग वाढला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.