वानखेडेंबद्दल पोस्ट करण्यावर बंदी! नवाब मलिकांना दणका!

वानखेडेंबद्दल कुठलीही पोस्ट करणार नाही : नवाब मलिकांनी कोर्टात दिली हमी!

    दिनांक  25-Nov-2021 13:22:06
|
Nawab _1  H x Wमुंबई
: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटूंबाबद्दल कुठल्याही प्रकारचे आरोप किंवा वक्तव्य करण्यास पुढील सुनावणीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत वक्तव्य करण्यास मलिकांना बंदी घालण्यात आली आहे.
 

मंत्री मलिक यांच्या वकिलांनीही मलिक या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे यांच्या संदर्भात कुठलीही पत्रकार परिषद, वक्तव्य किंवा पोस्ट करणार नसल्याची हमी न्यायालयात दिली आहे. वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत बंदी घातल्याने वानखेडे कुटूंबियांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

 
नवाब मलिकांच्या आरोपांच्या फैरी सुरूच!


दरम्यान, मंत्री मलिक यांनी गुरुवारी सकाळपासूनच मलिकांवर आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या होत्या. आईच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू?; असा आरोप समीर वानखेडेंवर केला. रोज नवनवे खुलासे करणाऱ्या नवाब मलिक यांनी यावेळी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूपत्राचे दाखले शेअर केले आहेत. यामधील एका दाखल्यात हिंदू तर दुसऱ्यात मुस्लिम असा उल्लेख आहे, असे ते म्हणाले.
 
 
नवाब मलिक यांनी याबद्दल ट्वीट केले. समीर वानखेडे यांच्या आई झहेदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मृत्यूचे दाखले शेअर केले. १६ एप्रिल २०१५ रोजी झहेदा यांचे निधन झाले. तसा उल्लेख या दाखल्यात करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी यावेळी या दोन्ही दाखल्यांवर उल्लेख असलेल्या धर्माकडे लक्ष वेधलं आहे. एका दाखल्यावर मुस्लिम असा उल्लेख असून दुसऱ्या दाखल्यात हिंदू असा उल्लेख आहे. “अजून एक फर्जीवाड़ा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत ज्ञानदेव वानखेडे,” असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


याआधी नवाब मलिक यांनी दोन व्यक्तींचा फोटो ट्विट करत हा फोटो निकाहच्या वेळच्या असल्याचा दावा केला होता. “कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, अशा कॅप्शनसहीत मलिक यांनी हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये डावकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती मुस्लीम धर्मगुरु असून फोटोत दिसणारे वानखेडे हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. फोटोमध्ये जी व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय तिने मुस्लीम बांधव घालतात त्याप्रमाणे डोक्यावर गोल टोपी घातल्याचं दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलिक यांनी वानखेडे यांचा वाशीमध्ये एक बार असल्याचा दावा केला होता. वानखेडे यांच्या नावे या बारचा परवाना असल्याचं म्हटलं होतं.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.