तिन्ही नवे कृषी कायदे रद्द; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

25 Nov 2021 13:54:14

ANURAG THAKUR.jpg_1 




शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचा अट्टाहास कायम







नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्यास एकमताने मंजुरी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता या कायद्यांना परत घेण्याचा प्रस्ताव संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असली, तरी शेतकरी संघटनांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा अट्टाहास कायम आहे.




 
गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ





 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’ला मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च २०२२ पर्यंत मोफत धान्यपुरवठा करण्यात येणार आहे.













Powered By Sangraha 9.0