देश चालविण्यासाठी पैसे नसल्याची पाक पंतप्रधानांची अखेर जाहीर कबुली

25 Nov 2021 13:15:57

imran khan.jpg_1 &nb

 
इस्लामाबाद : देश चालविण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याची जाहीर कबुली अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नुकतीच दिली. ‘ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस सिस्टीम’च्या उद्घाटनप्रसंगी इमरान खान यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर जाहीर भाष्य केले. ते म्हणाले की, “देश चालवण्यासाठी पुरेसे पैसे नसणे हे एक सर्वात मोठे आव्हान आहे.

 
परदेशांकडून उधार घेणे भाग पडत असल्याने पाकिस्तानवर सध्या कर्जाचे ओझे खूप वाढत चालले आहे. सध्या पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे. उत्पन्न कमी आहे आणि खर्च अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करप्रणाली सुरळीत होऊ शकलेली नाही. देशातील अनेक नागरिकांनी करचुकवेगिरी केली. ही चांगली गोष्ट नाही. परंतु, अनेक नागरिकांना ही गोष्ट अद्याप लक्षात आलेली नाही. कर वसुली नागरिकांच्या हितासाठीच केली जाते,” असे म्हणत इमरान खान यांनी नागरिकांना करप्रणालीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

इमरान खान यांनी निवडणुकांदरम्यान पाकिस्तानला परदेशी कर्जांतून मुक्त करून ‘रियासत-ए-मदिना’ बनवण्याचे आश्वासन निवडणुकांदरम्यान दिले होते. आता मात्र देश कंगाल झाल्याची कबुली त्यांनी देशवासीयांसमोर दिल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


Powered By Sangraha 9.0