ऊ.प्रदेशात आ. अदिती आणि वंदना सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021
Total Views |

UP_1  H x W: 0
लखनौ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये राजकीय पडघम जोरात वाजण्यास सुरुवात झाली असून भाजपने बुधवारी काँग्रेसला मोठा झटका दिला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला मानला जाणार्‍या रायबरेली मतदारसंघातील आमदार अदिती सिंह यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केवळ अदिती सिंहच नाही, तर आझमगढच्या सगडी मतदारसंघाच्या बसपाच्या आमदार वंदना सिंह यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थित या दोन्ही महिला नेत्यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी अदिती सिंह यांनी कृषी कायद्यांविषयी बोलताना काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. “कृषी कायदे माघारी घेण्याच्या घोषणेनंतरही प्रियांका गांधी यांना समस्या आहेत. नेमके त्यांना काय हवे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. त्या या प्रकरणात केवळ राजकारण करत आहेत,” अशी टिप्पणी त्यांनी केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.





२०१७ मध्ये अदिती सिंह रायबरेली मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. आदिती सिंह यांची ओळख म्हणजे त्या प्रदेशातील ‘बाहुबली’ म्हणून प्रसिद्ध असणार्‍या अखिलेश सिंह यांच्या सुपुत्री आहेत. तब्बल पाच वेळा आमदारकी मिळवणार्‍या अखिलेश सिंह यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर अदिती सिंह यांची भाजपशी जवळीक वाढल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे काँग्रेसकडून अदिती सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी अगोदरच विधानसभा अध्यक्षांना पत्र धाडण्यात आले होते. रायबरेली हा मतदारसंघ काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. मात्र, आता तेथूनच अदिती सिंह यांच्या रुपात या जागेवर भाजपला एक मोठा चेहरा सापडला आहे.समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या आझमगढ येथील आ. वंदना सिंह यांच्या पक्षप्रवेशाने भाजपने काँग्रेससोबत सपाच्या गडालादेखील सुरुंग लावल्याची चर्चा राजकारणात आहे.






 
@@AUTHORINFO_V1@@