मुंबईत पर्यटकांसाठीच्या खुल्या बससेवेला उत्तम प्रतिसाद

25 Nov 2021 23:46:47
 
bus_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये शहरात येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक मुंबईकर जनतेसाठी दि.०३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली बसगाडीतून पर्यटन सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या बसे गाड्यांच्या केवळ दोनच फेऱ्या शनिवार आणि रविवार यादिवशी प्रवर्तित करण्यात येत होत्या. मात्र, दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रवासीसंख्या आणि प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये अधिक दोन फेऱ्यांची भर टाकण्यात आली आहे. नरिमन पॉईट येथून दुपारी ३.०० आणि सायंकाळी ५.०० वाजता दोन अतिरिक्त बसफे-या नरिमन पॉईट येथून सुरु करण्यात आल्या आहेत.
 
 
दररोज सरासरी २०० पर्यटक आणि मुंबईकर या पर्यटन बससेवेचा लाभ घेत आहेत. या पर्यटन बससेवेला प्रवाशांचा मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन प्रवाशांच्या मागणीनुसार शनिवार, दि. २७.११.२०२१ पासून फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी दोन अतिरिक्त बसफे-या बेस्ट उपक्रमामार्फत चालविण्यात येणार आहेत. अशी माहिती 'बेस्ट' प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0