बिडीडी चाळ पुनर्विकासात रहिवाशांना २५ लाख कॉर्पस फंडासह अन्य मागण्या मंजूर करा!

25 Nov 2021 19:29:59

Ramdas Athwale _1 &n




मुंबई : बीडीडी चाळ रहिवसीयांना पुनर्विकासाठी करारपत्र कायदेशीर सुरक्षित करण्यात यावे. किमान 17 ते 25 लाखांचा कॉर्पस फंडची तरतूद करण्यात यावी आणि लेआऊट याबाबत च्या रहीवासीयांच्या मागणीची पूर्तता करण्याची सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.



वरळी येथील बीडीडी चाळ येथे रामदास आठवले यांनी भेट देऊन पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी राज्य शासन; म्हाडा;सार्वजनिक बांधकाम ;आणि टाटा कन्ट्रक्शन कंपनी चे अधिकारी उपस्थित होते.जम्बोरी मैदान येथील आंबेमाता मंदिर येथे अधिकारी आणि बीडीडी रहिवासी यांची संयुक्त बैठक रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
 
 
 
टाटा कंपनी आणि राज्य शासन यांनी एकत्र कॉर्पस फंड ची तरतूद करावी अशी सूचना  रामदास आठवले यांनी केली. यावेळी राहिवसीयांच्या मागण्यांचा विचार करुन त्यांना पुनर्विकास प्रकल्पाचे लेआऊट दाखवावे. तसेच राहिवसीयांबरोबर होणारे करारपत्र नेमके काय आहे ते दाखवावे. तसेच कॉर्पस फंड ची राहिवसीयांची मागणी पूर्ण करावी. राहिवसीयांना विश्वासात घेऊन पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याची सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केली.


बीडीडीचाळ पुनर्विकास करताना मोकळी मैदाने; गार्डन; शाळा; हॉस्पिटल यासाठी जागा उपलब्ध रहावी म्हणून 42 माळ्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यात 5 लिफ्ट असतील. अशी माहिती  रामदास आठवले यांनी दिली. बीडीडी चाळ पुनर्विकास मध्ये पात्रता 1 जानेवारी 2021 पर्यंतची निश्चित करण्यात आल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.



Powered By Sangraha 9.0