काश्मीरच्या मुद्द्यांपासून दूर रहा ; गंभीरच्या घराबाहेरच बनवला व्हिडियो

25 Nov 2021 16:30:22

Gambhir_1  H x
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला पुन्हा एकदा आयसीस काश्मीरकडून धमकी मिळाली आहे. यानंतर त्याने पुन्हा दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. ईमेलमध्ये लिहिले होते की, "आम्ही तुला मारण्याचा निर्णय घेतला होता, पण तू कसा तरी वाचलास. जर तुला तुझ्या कुटुंबाचे आयुष्य प्रिय असेल तर राजकारण आणि काश्मीरच्या प्रश्नांपासून दूर राहा." या ईमेलसोबत एक व्हिडिओही पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्याच्या घराबाहेर शूट करण्यात आला आहे.
 
 
यापूर्वीही अगदी दोन दिवसांपूर्वी गंभीर आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा मेल मिळाला होता. दिल्ली पोलिसांकडे याबद्दल तक्रार केल्यानंतर त्यांनी तपासा सुरु केला. हा धमकीचा मेल पाकिस्तानातून आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या समोर आली. दिल्ली पोलिसांनी 'गूगल'कडे या मेलसंबंधी माहिती मागितली होती. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई मेल पाकिस्तानातून करण्यात आला आहे. हा मेल ज्या सिस्टममधून पाठवण्यात आला त्याचा आयपी अॅड्रेस (IP Address) पाकिस्तानात आढळला आहे.
 
 
 
 
 
आयसीस काश्मीरच्या या गटाने पत्रकार आदित्य राज कौल यालादेखील जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली असून त्यात म्हंटले आहे की, त्यांनी उत्तर प्रदेश पोलीस आणि स्पेशल सेलला या धमकीची माहिती दिली असून लवकरच दहशतवादी पकडले जातील अशी अपेक्षा आहे. कौलने धमकीच्या मेलचे तीन स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये त्याला स्पष्ट शब्दात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0