१ डिसेंबरपासून १ली ते ४थी शाळा सुरू होणार

    दिनांक  25-Nov-2021 17:03:27
|

Varsha Gaikwad _1 &n

मुंबई : कोरोनामुळे दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील प्राथमिक शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती दर्शविली होती.पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सने ग्रीन सिग्नल दिला होता. आता सरकारनेही मान्यता दिली आहे. १ डिसेंबरपासून राज्यातील सगळ्या प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. १ डिसेंबर पासून पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.