‘दुर्दम्य लोकमान्य - तो स्वराज्यसिंह एक’ हा सर्वोत्तम लघुपट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021
Total Views |


KIRAN SIR 2.jpg_1 &n

 



नाशिक :
दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि सा. ‘विवेक समूहा’मार्फत निर्मित ‘दुर्दम्य लोकमान्य - तो स्वराज्यसिंह एक’ हा एक सर्वोत्तम लघुपट आहे, अशी भावना येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंगटा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित विशेष प्रदर्शन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.








बुधवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘दुर्दम्य लोकमान्य - तो स्वराज्यसिंह एक’ या लघुपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले.या प्रसंगी लघुपटाबद्दल माहिती देताना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार म्हणाले की, “भारतात माध्यमे रुजली त्यामागे एक अधिष्ठान होते. प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत पत्रकार हे एक विचारांचा प्रवाह आपल्या समवेत पुढे घेऊन जाताना दिसतात. लोकमान्य टिळक हे ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून जसे सुपरिचित आहेत, तसेच ते ‘विचारांच्या प्रवाहाचेदेखील जनक’ आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे विचारांचे पाईक असणारे दैनिक आहे. लोकमान्य टिळकांचे व्यक्ती व विचारदर्शन मोठे आहे. समाजातील विविध विषयांतील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणून लोकमान्यांच्या विचारांचा जागर व्हावा, या उद्देशाने हा लघुपट तयार करण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.





 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नाशिक येथील उपसंपादक/प्रतिनिधी प्रवर देशपांडे यांनी केले. आभार दै. ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर यांनी मानले. यावेळी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, भाजप प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, रा. स्व. संघ जिल्हा कार्यवाह कृष्णाजी घरोटे, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’चे सरकार्यवाह दिलीप बेलगावकर, हेमंत देशपांडे, बांधकाम व्यावसायिक सुनील भायभंग, इतिहास अभ्यासक विजय निपाणकर, महापालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी सुनीता धनगर, ‘राम बंधू मसाले’चे हेमंत राठी, रा. स्व. संघ विभाग कार्यवाह प्रमोद कुलकर्णी, रा. स्व. संघ शहर संघचालक विजय कदम, रा. स्व. संघ शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, ‘नाशिप्र मंडळा’चे सचिव अश्विनकुमार येवला, ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे, प्रकाशक स्वानंद बेदरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी लघुपट उत्तम असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले.









@@AUTHORINFO_V1@@