'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये पट्टेरी वाघाने केली शिकार

24 Nov 2021 17:42:27
tiger_1  H x W:


मुंबई (अक्षय मांडवकर) - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा (sahyadri tiger) अधिवास आढळून आला आहे. नुकताच या वनक्षेत्रात वाघाने शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास (sahyadri tiger) असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकाराने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह' आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. त्यापूर्वी २९.५३ चौ.किमीच्या तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्हची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या तिन्ही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा (sahyadri tiger) अधिवास आहे. आंबोलीत यापूर्वी वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवेशष मिळाले आहेत. लाॅकडाऊनच्या काळातही आंबोली परिसरात नर वाघाचे (sahyadri tiger) छायाचित्र हे वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले होते. आता तिलारी आणि आंबोलीच्या वनक्षेत्रांनी जोडलेल्या चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाचा (sahyadri tiger) वावर निदर्शनास आला आहे.

नुकताच याठिकाणी वाघाने रेड्याची शिकार केल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. वाघ हा रेड्याला झुडपांमध्ये फरफटत घेऊन गेला आणि त्याठिकाणी रेड्याला खाल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. शिवाय तिथे वाघाच्या पायाची पदचिन्हे देखील सापडली आहेत. त्यामुळे वाघाच्या (sahyadri tiger) अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे. काॅन्झर्वेशन रिझर्व्हच्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन तो संरक्षित झाल्याचा हा परिणाम आहे. वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) महत्त्वपूर्ण असल्याची माहिती सह्याद्रीतील व्याघ्र संशोधक गिरीश पंजाबी यांनी दिली. भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ (sahyadri tiger) हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Powered By Sangraha 9.0