पेट्रोल-डिझेल नव्हे तर हायड्रोजनवर चालणारी कार येणार : गडकरी

    दिनांक  24-Nov-2021 16:48:29
|

nitin gadkari.jpg_1 नवी दिल्ली :
आताच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. देशातील ग्राहकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक वाढताना दिसत आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल, डिझेल नाही, इलेक्ट्रिकही नाही, तर हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे.तसेच हायड्रोजन इंधन हे भविष्य असल्याचा दावाही गडकरी यांनी केला आहे.


इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी पुढील महिन्यात एक कार खरेदी करणार आहे, जी हायड्रोजनवर चालेलदेशात २५० स्टार्टअप कंपन्या ई-वाहनांवर काम करत आहेत आणि यामुळे लवकरच इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही चांगली वाढ होत आहे. हायड्रोजन इंधन हे भविष्य असून, मी पुढील महिन्यात एक कार खरेदी करणार आहे, जी हायड्रोजनवर चालेल, असे गडकरी यांनी सांगितले.

 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.