...म्हणून डॉ. निलेश साबळेने मागितली मंत्री नारायण राणेंची माफी

दिवाळी कार्यक्रमात केलेले विडंबन पडले महाग

    दिनांक  24-Nov-2021 15:26:36
|

Nilesh Sabale_1 &nbs
मुंबई : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे मालिकेचे दिग्दर्शक, सूत्रसंचालक निलेश साबळे आणि त्याच्या काही सहकार्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणेंची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. एवढेच नव्हे तर, दिवाळी निमित्त दाखवलेल्या एका विडंबनावरून माफीदेखील मागितली.
 
 
नक्की का मागितली माफी?
 
 
दिवाळीच्या काळात दिवाळी अधिवेशन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काही राजकीय व्यक्तींची विडंबने दाखवली होती. त्यात राणे यांचे हुबेहुब पात्र दाखवण्यात आले होते. या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदवत राणे यांचा अवमान झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर त्यांनी सातत्याने वाहिनीला आणि साबळे यांना फोन करून माफीची मागणी केली होती. सोशल मीडियावरही यावरून वादंग निर्माण झाला होता.
 
 
हा वाद अधिक वाढू नये यासाठी २३ नोव्हेंबर रोजी निलेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. "नारायण राणे हे स्वतः 'चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे प्रेक्षक आहेत. त्यांनी कलाकारांचा नेहमी सन्मान केला आहे. अशावेळी एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परत अशी चूक होणार नाही," असे निलेश साबळे यांनी यावेळी सांगितले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.