एप्रिलमध्ये वाजणार आयपीएल २०२२चा डंका?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2021
Total Views |

IPL 2022_1  H x
नवी दिल्ली : नुकतेच दुबईमध्ये आयपीएलचा १४वा हंगाम पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यानंतर आता वेध लागले आहेत ते आगामी आयपीएलच्या १५व्या हंगामाचे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यावेळी १० संघ खेळणार असून मेगा लिलावदेखील होणार आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघात असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, आता मिळालेल्या माहितीनुसार आगामी आयपीएल २०२२चे आय्प्जन २ एप्रिल २०२२पासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून लवकरच वेळापत्रक जाहीर होऊ शकते.
 
 
बीसीसीआयने यापूर्वीच अशी घोषणा केली आहे की, यंदाचे आयपीएलचे सर्व सामने भारतातच खेळले जाणार आहेत. तसेच, आता ८ ऐवजी १० संघ खेळवण्यात येणार असून मेगा लिलाव करण्यात येणार आहे. दोन नव्या संघांची भर पडल्याने सामन्यांची संख्या ही ६० वरून ७४ करण्यात आली आहे. या हंगामाचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार असून, त्याची तारीख मात्र अजून ठरवण्यात आली नाही.
 
 
नुकतेच, संघांच्या लिलावात लखनौ आणि अहमदाबादच्या रूपाने दोन नव्या संघाचा समावेश करण्यात आला आहे. आरपी संजीव गोयंका या ग्रुपने ७,०९० कोटी रुपयांमध्ये लखनौ संघ विकत घेतला आहे. त्याचवेळी सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादचा संघ ५२०० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. त्यामुळे आता पुढील आयपीएलमध्ये चुरस आणखी वाढणार असल्याचे मत क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@