'सरदार उधम'सारखे चित्रपट बनवताना मी प्रसिद्धीचा विचार करत नाही : शूजीत सरकार

इफ्फी ५२ मास्टरक्लासमध्ये दिग्दर्शक शुजीत सरकारने व्यक्त केले मत

    दिनांक  24-Nov-2021 14:41:23
|

Sardar Udham_1  
पणजी : सध्या ५२वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीमध्ये सुरु आहे. यावेळी 'चित्रपट यशस्वी करणे आणि सरदार उधम संदर्भात कथाकथन' या विषयावरील चर्चेत 'सरदार उधम' आणि झालेल्या वादावर चित्रपटाचे दिग्दर्शक शुजीत सरकार याने आपले मत व्यक्त केले. " 'सरदार उधम'सारखे चित्रपट बनवताना मी प्रसिद्धीचा विचार करत नाही." असे त्याने म्हंटले आहे.
 
 
दिग्दर्शक शुजीत सरकारने म्हंटले आहे की, "सरदार उधम सारखे चित्रपट बनवताना मी प्रसिद्धीचा विचार न करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. जेव्हा मी चित्रपट बनवतो तेव्हा मी प्रथम प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून विचार करतो. आम्ही कल्पना आणि विचारधारेवर आधारित चित्रपट तयार करण्यावर विश्वास ठेवतो. प्रसिद्धी किंवा पुरस्कारांसाठी नाही तर चित्रपट रसिक ते चित्रपट पाहत आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे." असे मत त्याने व्यक्त केले.
 
 
"सरदार उधम हे एक अंतर्कलह असलेले व्यक्तीमत्व आहे आणि आम्ही बहुतेक ठिकाणी संगीताचा वापर करून त्यांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला. शांततेशी जुळेल अशाप्रकारचे संगीत आपण तयार करूया, असे मी संगीत दिग्दर्शक शंतनू मोईत्रा यांना सांगितले होते." असे त्यांनी पुढे सांगितले. यानंतर 'कोई झिंदा है?' या संवादाबाबत त्याला विचारले असता त्याने सांगितले की, "हा फक्त संवाद नाही. हा संवाद वेगवेगळ्या पद्धतीने उलगडता येऊ शकतो. हा माझा प्रश्न आहे, जो प्रेक्षकांच्या सामूहिक विवेकबुद्धीला उद्देशून आहे. तसेच हा प्रश्न प्रेक्षकांना अंतर्बाह्य हलवून सोडण्याबाबतचा संदेशही देतो"
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.