अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ९० इमारतींना नोटीस

23 Nov 2021 23:35:03

fire_1  H x W:  
 
 
 
मुंबई : मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून वारंवार घडत असलेल्या आगीच्या घटनांवरून अग्निशमन दलाने कारवाईला सुरुवात केली आहे. यापूर्वीही प्रशासनातर्फे अग्निसुरक्षा पालन करण्याबाबत इमारत प्रशासन आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबतच इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत कालावधीत देखील प्रशासनातर्फे घट करण्यात आली होती.
 
 
 
त्यासोबतच अग्निशमन दलाने याबाबत आणखी एक पाऊल टाकले आहे. मुंबईतील सुमारे ९० हून अधिक निवासी इमारतींना अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे मुंबई अग्निशमन दलाने नोटिसा पाठवल्या आहेत. दरम्यान, नोटीस बजविण्यात आलेल्या इमारतींनी नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0