CAA-NRC रद्द न केल्यास आणखी एक शाहीन बाग उभारू, ओवैसींची धमकी

22 Nov 2021 16:23:06
CAA_1  H x W: 0


लखनऊ -
'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन'चे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारकडे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) रद्द करण्याची मागणी केली आहे. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) वर कायदा आणल्यास नवीन 'शाहीन बाग' उभारला जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. शाहीन बाग हा राजधानी दिल्लीचा एक भाग आहे जो सीएए विरोधी निषेधाचे केंद्र होता.


एआयएमआयएमचे प्रमुख ओवैसी यांनी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कृषी कायद्याप्रमाणे सीएए रद्द करण्यात यावा. एनपीआर-एनआरसीवर कायदा बनवला तर आणखी एक शाहीन बाग तयार होईल." पुढे ते म्हणाले, "मी पीएम मोदी आणि भाजपला आवाहन करतो की, सीएए हा कृषी कायद्याप्रमाणे मागे घ्यावा कारण तो संविधानाच्या विरोधात आहे. जर त्यांनी एनपीआर आणि एनआरसीवर कायदा केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि इथे आणखी एक शाहीन बाग बांधू."

त्याचवेळी रामपूरमध्ये आयोजित सभेत ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नौटंकी म्हटले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात मोठे 'नौटंकीबाज' असून चुकून राजकारणात आले आहेत. ते राजकारणात नसते तर चित्रपटसृष्टीतील लोकांचे काय झाले असते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे सर्व पुरस्कार फक्त मोदीच जिंकतील. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यांनी आंदोलनकारी शेतकऱ्यांना आपापल्या घरी परतण्याचे आवाहन केले. असे असतानाही कथित शेतकरी नेते आडमुठेपणा दाखवत आहेत.
Powered By Sangraha 9.0