मोठी बातमी! : परमवीर सिंहांना अटकेपासून सुप्रीम कोर्टाचं संरक्षण

22 Nov 2021 13:42:14
aramvir Singh _1 &nb


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालायाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. परमवीर सिंह यांनी देश सोडला नसून ते भारतातच आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच तपास सीबीआयकडे सोपविल्यास परमवीर ४८ तासांत हजर होतील. मुंबई पोलीसांपासून त्यांना कारवाईचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
मुंबई पोलीस आणि सीबीआयने परमबीर सिंह यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने परमवीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी ते भारतातच असल्याची माहिती दिली. सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास दिल्यास ते ४८ तासांत ते हजर होतील, असेही बाली म्हणाले आहेत. परमवीर सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सूपूर्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असं सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
 
 
राज्य सरकारला हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मोठा दणका मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचं म्हटल्यानं ते परदेशात असल्याचं सांगितलं गेल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. परमबीर सिंह समोर पुढे आले तर अनिल देसमुख यांच्या अडचणीत वाढणार आहेत. परमबीर सिंह यांनी पाठवलेले पत्र मागे घ्यायला सांगितलं गेलं आणि गृहमंत्र्यांच्या बाबतीत शांत राहायला सांगितलं. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.



Powered By Sangraha 9.0