पुण्यातील प्रसिद्ध आयसर संस्थेला आयजीईएम स्पर्धेत सुवर्णपदक

    दिनांक  21-Nov-2021 23:53:49
|

आयसर _1  H x W:
 
 
 पुणे : इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन (आयजीईम) फाउंडेशनतर्फे ४ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) विद्यार्थ्यांच्या संघाला आयजीईएम स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. बारा विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या संघाने दोन जिवाणूंना एकत्र वाढवून त्यांच्याद्वारे ब्युटानॉल हे इंधन तयार करण्याचा प्रकल्प सादर केला होता.विशेष म्हणजे, आयसर पुणे संघाने सलग दोन वर्ष सुवर्णपदक जिंकायची किमया साधली आहे . इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन (आयजीईम) फाउंडेशनतर्फे ४ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेत पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी दिली जाते. यंदा या स्पर्धेत दोन जिवाणूंना एकत्र वाढवून रासायनिक संयुगे संश्लेषित करण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. तसेच यामध्ये पेट्रोकेमिकल्सद्वारे कार्बन उत्सर्जन होण्याची पद्धती टाळणे आवश्यक होते. त्यानुसार गेले काही महिने आयसर पुणेचा संघ सिनबॅक्टरी या प्रकल्पावर काम करत होता. या संघात अश्विन उदय, मिसाल बेदी, संजना वसंत, अश्ली जैन, नमस्वयं गोमथी शंकर, लिखित चंद्रगिरी, विदिशा हाटे, अर्श शेख, सूर्य नारायण, आकाश दत्ता, आर्य नरनपट्टी आणि जेसन जॉबी या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.