विनोद तावडे यांची भाजपचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती

21 Nov 2021 14:25:46

Vinod Tawade _1 &nbs
 
 
मुंबई : भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रविवारी संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात भाजपचे नेते विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी देत राष्ट्रीय महामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. तसेच बिहार राज्यासाठी ऋतुराज सिन्हा, झारखंडसाठी आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. पश्चिम बंगालसाठी भारती घोष यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आणि शहजाद पुनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच या नियुक्त्या तत्काळ लागू झाल्याचीही माहिती या परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.



Powered By Sangraha 9.0