नांदेड: नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि वंचितच्या उमेदवारांसह एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी आठ पासून मतमोजणीला सुरुवात झाली असून एकूण मतमोजणीच्या 30 फेऱ्या होणार आहेत.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. यामुळे येथील जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर तर भाजपाकडून सुभाष साबणे व वंचितकडून उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. महाविकास आघाडीचे मंत्र्यासह अनेक नेते गण प्रचारात उतरले होते. तर शिवसेनेतून भाजपावासी झालेले सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते ठाण मांडून होते. वंचितच्या उमेदवार उत्तम इंगोले यांच्यासाठीही बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या स्वतः लक्ष घातले होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून या निवडणुक निकालाकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.
या पोटनिवडणुकीत 63.95 टक्के मतदारांनी बजावले होते मतदानाचे कर्तव्य. पोटनिवडणूकीसाठी 412 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. एकुण पुरुष मतदार 1 लाख 54 हजार 92 तर एकुण स्त्री मतदार 1 लाख 44 हजार 256 एवढे आहेत. इतर मतदार 5 असे धरुन ही एकूण मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 353 एवढी आहे. यापैकी एकूण 1 लाख 90 हजार 800 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. यात पुरुष 1 लाख 768 मतदार तर स्त्री 90 हजार 31 मतदार तर इतर 1 मतदार असा समावेश आहे. मतदानाची एकुण टक्केवारी ही 63.95 टक्के एवढी आहे.
आज सुरू असलेल्या मतमोजणीसाठी सुमारे 150 अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी 14 टेबल तयार करण्यात आले असून सुमारे 30 मतमोजणीच्या फेऱ्या होतील. पहिली फेरी सकाळी 8 पासून सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने उर्वरीत फेऱ्या पूर्ण होतील.
90- देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुक निकाल
सुनिल रामदासी
----------------
टपाली मतदान
1) काँग्रेस -अंतापूरकर - 44
2)भाजपा-साबणे - 32
3)व.आघाडी.डाँ.इगोले- 00
-----------------
पहिली फेरी
1) काँग्रेस-अंतापूरकर - 4216
2)भाजपा-साबणे - 2592
3)व.आघाडी-डाँ.इंगोले - 320
काँग्रेस अंतापूरकर 1624 मतांनी आघाडीवर आहेत.
-----------------
दुसरी फेरी
1)काँग्रेस-अंतापूरकर - 7294
2)भाजपा-साबणे -5009
3)व.आघाडी-डाँ.इंगोले - 769
2 फेरी काँग्रेस अंतापुरकर 2293 मतांनी आघाडीवर आहेत.
-----------------
तिसरी फेरी
1)काँग्रेस-अंतापूरकर - 3418
2)भाजपा-साबणे - 2447
3)व.आघाडी-डाँ.इंगोले - 104
काँग्रेस अंतापुरकर 971मतांनी आघाडीवर आहेत.
-----------------
चौथी फेरी
1)काँग्रेस-अंतापूरकर - 3788
2)भाजपा-साबणे - 2495
3)व.आघाडी-डाँ.इंगोले - 352
------------------
पाचवी फेरी
1)काँग्रेस-अंतापूरकर - 3747
2)भाजपा-साबणे - 2134
3)व.आघाडी-डाँ.इंगोले - 280
काँग्रेस अंतापुरकर1613 अंतापुरकर मतांनी आघाडीवर आहेत.
काँग्रेस उमेदवार अंतापुरकर 6170 मतानी आघाडीवर
--------------------
सहावी फेरी
1)काँग्रेस-अंतापूरकर - 4085
2)भाजपा-साबणे - 2485
3)व.आघाडी-डाँ.इंगोले -335
----------------------
सातवी फेरी
1)काँग्रेस-अंतापूरकर - 3044
2)भाजपा-साबणे - 2600
3)व.आघाडी-डाँ.इंगोले -449
------------------
आठवी फेरी
1)काँग्रेस-अंतापूरकर - 3999
2)भाजपा-साबणे - 2709
3)व.आघाडी-डाँ.इंगोले -381
काँग्रेस जितेश अंतापूरकर - 29375
भाजप सुभाष साबणे - 19873
वंचित डॉ. उत्तम इंगोले - 2668
▪️अंतापूरकर 9502 मतांनी आघाडीवर