तो परत येतोय ! सिक्सर किंग दिसणार पुन्हा मैदानात...

02 Nov 2021 13:12:15

Yuvi_1  H x W:
मुंबई : भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगने पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. २०१९मध्ये त्याने निर्वृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो सचिन-सेहवागसोबत भारत लेजंटस संघातर्फे खेळताना दिसला होता. त्यानंतर आता युवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत पुन्हा एकदा मैदानात उतणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, तो कोणत्या लीगमध्ये खेळताना दिसणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही. विश्वचषक स्पर्धांमधील चॅम्पियन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. २००७ टी २० विश्वचषक, २०११ विश्वचषकमध्ये त्याचा मोलाचा वाटा होता.
 
 
युवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडियो पोस्ट करत लिहिले आहे की, "देव तुमचे नशीब लिहित असतो. लोकांची मागणी लक्षात घेता मी फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परत येईन अशी आशा आहे. यापेक्षा छान भावना असूच शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाला पाठिंबा देत राहा. कारण एक खरा चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!" यामुळे आता क्रिकेटच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0