मलिक हे नार्कोटिक्स काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते

02 Nov 2021 11:56:47
 
kotak_1  H x W:
 
  
मुंबई : "मागील काही दिवसांपासून नार्कोटिक्स काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे नशा करणाऱ्या आणि गांजाचे सेवन करणाऱ्या मंडळींचे समर्थन करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. एक ना एक अशा विविध मार्गानी ते या नशेबाजांचे समर्थन करण्यासाठी पुढे सरसावल्याचे मागील अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा नार्कोटिक्स काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते झाले आहेत," अशी टीका मुंबई भाजपचे नेते आणि खासदार मनोज कोटक यांनी नवा मलिक यांच्यावर केली आहे. सोमवार, दि. १ नोव्हेंबर रोजी कोटक यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
मलिकांवर टीका करताना खा.कोटक म्हणाले की, "सलग पाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविताना देवेंद्र फडणवीस यांच्या चारित्र्यावर कुठलाही दाग धब्बा लागलेला नाही. एक निष्कलंक मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्रात सिद्ध झाले आहेत. अशा निष्कलंक नेत्याच्या विरोधात मालिकांनी गरळ ओकली. मुळात मलिकांच्या जावयाच्या घरात गांजा सापडतो आणि ते जर त्याला हर्बल वनस्पती म्हणत असतील तर त्यांच्या कडून इतर काय अपेक्षा ठेवणार हाच सवाल आहे. मलिक हे मानसिक संतुलन बिघडवल्या सारखे दररोज पत्रकार परिषदा घेत आहेत, विविध फोटो प्रसिद्ध करत आहेत. मात्र असे या माध्यमातून चारित्र्य हनन करण्याचे प्रकार करून काहीही सध्या होणार नाही. तेव्हा या खेळाची सुरूवात आपण केलीत मात्र याचा शेवट देवेंद्र फडणवीस करतील हे लक्षात ठेवा," असा थेट इशारा खा. मनोज कोटक यांनी नवा मलिक यांना दिला आहे.
Powered By Sangraha 9.0