'धन्यवाद इंडिया!' म्हणत मिस्टर ३६०ची निवृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021
Total Views |

ABD_1  H x W: 0
 
 
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक एबी डिव्हिलियर्सने १९ नोव्हेंबरला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे घोषित केले. ट्विटरवर ट्विट करत त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे, गेली अनेकवर्ष आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एबीच्या निर्णयाचा भारतीय क्रिकेट चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. कारण, आधी विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आणि आता एबीने निवृत्ती जाहीर केली.
 
 
 
 
 
एबीने याआधी २३ मे २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, त्याने लीगमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केले होते. पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. "हा प्रवास फार भन्नाट होता मात्र मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे" असे म्हणत त्याने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे त्याने धन्यवाद या शब्दासहीत भारतीयांचेदेखील आभार मानायला विसरला नाही. कारण, आयपीएलमध्ये खेळताना त्याला भारतीयांकडून अमाप प्रेम मिळाले, हेही तो आपल्या मुलाखतींमध्ये सांगतो.
 
 
 
 
 
एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना ११४ कसोटी सामन्यात ५०.७च्या सरासरीने ८ हजार ७६५ धावा केल्या आहेत. २२८ एकदिवसीय सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९ हजार ५७७ धावा तर ७८ टी-२० सामन्यात ३९.७ च्या सरासरीने आणि १३५.२च्या स्ट्राईक रेटने १ हजार ६७२ धावा केल्या आहेत. तर इकडे आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना एबीने १८४ सामन्यात १५१.७च्या स्ट्राईक रेटने ५ हजार १६२ धावा केल्या आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@