कृषी कायदे रद्द केल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले...

19 Nov 2021 15:17:00
yogi aadityanath _1 




लखनऊ -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्र आणि शेतकरी आंदोलक यांच्यातील वादाचे मूळ असलेले तीन कृषी कायदे रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “शेतकरी संघटना तीन शेती कायद्यांविरोधात कशा पद्धतीने आंदोलन करत होत्या, हे आम्हाला माहीत आहे. गुरुपूरानिमित्त पीएम मोदींनी शेतीविषयक कायदे रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. अगदी सुरुवातीपासूनच, अशा लोकांचा एक मोठा गट होता ज्यांचा असा विश्वास होता की शेतीविषयक कायदे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्याचा मार्ग मोकळा करू शकतात."

ते पुढे म्हणाले, “असे असूनही, जेव्हा शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली तेव्हा सरकारने त्यांच्याशी संवाद साधण्याचे सर्व प्रयत्न केले. त्यांना पटवून देण्यात आम्ही अपयशी ठरलो असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. लोकशाहीचा भाव ठेवून शेती कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रकरणाचा विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो."
Powered By Sangraha 9.0