"मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही" : आ.मंगल प्रभात लोढा

19 Nov 2021 23:48:56

lodha_1  H x W: 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्देवी असून आम्ही त्या घटनांचा निषेध करत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील हिंसक घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, एक गोष्ट आम्ही स्पष्ट करू इच्छितो ती म्हणजे काहीही झाले तरी आम्ही मुंबईचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. राज्यातील हिंसाचाराविरोधात मुंबई भाजपतर्फे शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी आयोजित आंदोलनावेळी ते बोलत होते.
 
 
 
 
मुंबई भाजपचे अध्यक्ष व आ. मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथील हिंसक घटनांच्या निषेधार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन येथील अमर जवान ज्योत या ठिकाणी मुंबई भाजपतर्फे शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत आ.लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानतंर दंगलखोरांचा एक खास वर्ग सक्रिय होत हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. यासर्व हिंसक घटनामुळे राज्यातील हिंदू कुटुंबे आणि संस्थांचे नुकसान होत आहे. तसेच अफवांचा आधार घेऊन उघडपणे गुंडगिरी करत पोलिसांवर देखील लाठ्या-काठ्या, दगडफेक केली जात आहे. मात्र, काहीही झाले तरी असा हिंसाचार आम्ही मुंबईत होऊ देणार नाही, असा इशारा आ.मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी बोलताना दिला.
 
 
 
यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार राहुल नार्वेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0