माझी प्रचारक यात्रा या अनुवादित ग्रंथाचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2021
Total Views |

shashikant chauthaiwale_1
 
 
 
पुणे : श्री.शशिकांत चौथाईवाले लिखित आणि श्री. अनिल चौथाईवाले अनुवादित ''माझी प्रचारक यात्रा'' या ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता पुण्यातील सदाशिव पेठ मधील भारतीय विचार साधना भवन येथे पार पडला. ''मेरी प्रचारक यात्रा'' या मूळ हिंदी मधील ग्रंथाच्या मराठी अनुवादित माझी प्रचारक यात्रा या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य असणाऱ्या श्री.अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर भारतीय विचार साधनेचे उपाध्यक्ष चित्तरंजनजी भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा. श्री.अनिरुद्ध देशपांडे, या ग्रंथाचे लेखक श्री. शशिकांतजी चौथाईवाले आणि या ग्रंथाचे मराठी मध्ये अनुवाद करणारे अनिल चौथाईवाले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सुधीरजी पाचपोर यांच्या हिंदी मधील ''लोकमन संस्कार करना'' या हिंदी मधील गीतगायनाने झाली. मेरी प्रचारक यात्रा हा ग्रंथ मूळ हिंदी भाषेतील असून अनिल चौथाईवाले यांनी या ग्रंथाचा मराठी भाषेमध्ये अनुवाद केला आहे. या ग्रंथाचे लेखक शशिकांत चौथाईवाले यांनी १९६१ पासून आत्ताच्या आसाम राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम बघितले. तालुका प्रचारक ते क्षेत्र प्रचारक अश्या संघाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडल्या नंतर काही वर्षे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून देखील काम पाहिले. सध्या ते वरिष्ठ प्रचारकाची जबाबदारी पार पाडत असून ते सध्या आसाम राज्यातील सिल्चर येथे वास्त्यव्यास आहेत. शशिकांत चौथाईवाले यांनी १९६१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे आसाम मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या ६० वर्षांमधील त्यांना आलेल्या आसाम मधील संघकार्यातील अनुभवांवर हे पुस्तक आधारित आहे.


भारतीय विचार साधनेचे उपाध्यक्ष चित्तरंजनजी भागवत यांनी सुरुवातीला भारतीय विचार साधनेच्या कार्याचा आढावा घेतला. भारतीय विचार साधनेच्या कार्याचा आढावा घेताना चित्तरंजन भागवत म्हणाले कि, '' गेली ४१ वर्षे भारतीय विचार साधना भारतीयत्वाच्या विचारांच्या प्रचाराचे आणि प्रसाराचे काम करीत आहे. संस्कृत, शिल्पकला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य , हिंदुत्व इत्यादी आणि अश्या अनेक विषयांवर भारतीय विचार साधनेने ७०० पेक्षा अधिक ग्रंथ, पुस्तक प्रकाशित केली आहेत. या वर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. याचे औचित्य साधून भारतीय विचार साधना भारतीय स्वातंत्र्याचा विविध पैलूंनी मागोवा घेणारे पुस्तक काही कालावधीतच प्रकाशित करणार आहे असेही ते म्हणाले.


मेरी प्रचारक यात्रा या मूळच्या हिंदी ग्रंथाचे मराठी भाषेमध्ये अनुवाद करणारे अनिल चौथाईवाले या वेळीज म्हणाले कि, '' या ग्रंथाचा मराठी मध्ये अनुवाद करताना मला कुठेही मी पणा, स्वःचा उल्लेख कुठेही आढळलेला नाही. देशकार्य, संघकार्य करताना निरंकारी, निर्लेप जीवन कस जगता येत याचा उत्तम अनुभव पुस्तक वाचताना आणि अनुवादित करताना येतो.


या पुस्तकाचे लेखक शशिकांतजी चौथाईवाले यांनी आपले आसाम मधील संघकार्य करतानाचे अनुभव या वेळीज उपस्थितांसमोर मांडले. आपले आसाम मधील संघ कार्याचा अनुभव सांगताना शशिकांतजी चौथाईवाले म्हणाले कि, '' १९६१ मध्ये मी संघाने जबाबदारी माझ्यावर सोपवल्याप्रमाणे आसाम मध्ये आपले काम सुरु केले. १९६१ मधील आसाम राज्यातील संघाची स्थिती आणि सध्याची आसाम मधील संघाची स्थिती यात बदल झालेला दिसत आहे आणि हा बदल केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या अविरत परिश्रमामुळेच दिसतो. त्यांनी यावेळेज संघाने देशाला १९६२ च्या भारत चीन युद्धवेली केलेली मदत, संघाने १९६५ च्या भारत पाकिस्तान च्या युद्धवेळी भारतीय लष्कराला केलेली मदत याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आसाम, त्रिपुरा या राज्यातील प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन आज सक्षम पणे उभा राहिला आहे असेही ते यावेळेज म्हणाले.


कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा. श्री.अनिरुद्ध देशपांडे यांनी या ग्रंथाच्या भाषांतराचे कौतुक केले आणि हा ग्रंथचं अंतकरणाने लिहला असून हा एक भावनीक ग्रंथ आहे असेही ते म्हणाले. माझी प्रचारक यात्रा हा ग्रंथ कुठल्याही ग्रंथप्रकारात मोडत नसल्याचेही ते म्हणाले. प्रतिकूलतेवर मात करणारी विधायक प्रवृत्ती म्हणजेच ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'' होय अशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली.


या ''माझी प्रचारक यात्रा या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी बिडवे यांनी केले तर आभार चित्तरंजनजी भागवत यांनी मानले.

   
 
@@AUTHORINFO_V1@@