समीर वानखेडेंना बदनाम करण्यासाठी दिली अर्धवट माहिती

18 Nov 2021 15:26:48

Kranti Redkar_1 &nbs
मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर नवाब मालिकांनी, 'समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र दाखवला असल्याचा दावा केला. यावर मलीकांनी वानखेडेंच्या धर्माबद्दल माहिती देण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला समोर आणला. मलिक यांनी हे प्रमाणपत्र देऊन पुन्हा एकदा वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप केला. मात्र, यावर वानखेडे यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने, "समीर वानखेडेंना बदनाम करण्यासाठी दिली अर्धवट माहिती दिल्याचा आरोप केला आहे.
 
 
 
 
क्रांती रेडकरने नवाब मलिकांच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी काही कागदपत्रे ट्विटवर पोस्ट केली आहेत. तसेच, समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी अर्धवट माहिती दिली असल्याचे क्रांती रेडकरने म्हंटले आहे. “समीर वानखेडे यांची बदनामी करण्यासाठी वाईट विचारांच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली आहे. एक चूक झाली होती. नंतर त्याची रीतसर दुरुस्ती ज्ञानदेव वानखेडेंनी १९८९मध्ये सर्व कायदेशीर औपचारिकता आणि प्रक्रियांसह केली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रे स्वीकारली आणि पडताळली आहेत.” असे तिने सांगितले आहे.
 
 
 
 
 
पुढे तिने आणखी काही कागदपत्रे जोडली असून म्हंटले आहे की, "समीर वानखेडे यांचे नाव बदनाम करण्यासाठी डाव रचले जात आहेत. सर्वांनी दिलेल्या पत्रातील मजकूर आणि आरोप केलेल्या सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या मजकुराची पडताळणी करावी. एका बाब अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे एका प्रामाणिक अधिकाऱ्याला कलंकित करण्यासाठी काही आपल्या समाजातील काही लोक किती खालच्या थराला जातील?" असे म्हणत तिने नवाब मालिकांना तसेच वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0