अवघ्या १२ तासांत २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सुस गावातील लोकांना दिलासा

    दिनांक  18-Nov-2021 23:47:26
|

Amol Balwadkar _1 &n
 
 
 

पुणे : सुस गावात पिण्याचे पाणी घेण्यासाठी अनेक नागरिक बाणेर पर्यंतचा २-३ किमीचा प्रवास करत असतात, यातील काही पायपीट करत तर काही लोक मोटारसायकलवरून २० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी येत असतात . दररोजची त्यांची ही पायपीट आणि मोटारसायकलवर पाणी वाहण्याची शृंखला सुरू असल्याचे भाजप नगरसेवक अमोल बालवाडकर यांना समजले.'' हे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे काम पाहून आपण नगरसेवक म्हणून यांच्यासाठी काहीतरी करायलाहवे असे आपल्याला वाटले. त्यामुळे त्याच क्षणी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला व मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या २४ तासाच्या आत तुमच्या घरापासून अगदी नजीकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतो. लगेचच यंत्रणा कामाला लावून आणि अवघ्या १०-१२ तासात तेथे प्रत्येकी २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. त्यात पाणी आणून जलपूजन केले व तात्काळ आजच्या आज ते लोकांना वापरासाठी उपलब्ध करून दिले''. असे अमोल बालवडकर यांनी या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या लोकार्पणावेळीज सांगितले.


या वेळी अधिक बोलताना अमोल बालवडकर म्हणाले कि , आज सकाळी मी माझे सहकारी नारायणराव चांदेरे, श्री.अनिल बापू ससार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुस मध्ये गेलो असता अनेक महिला भगिनींनी पिण्याच्या पाण्याची मागणी केली. पिण्याचे पाणी घेण्यासाठी अनेक नागरिक बाणेर पर्यंतचा २-३ किमीचा प्रवास करतात, यातील काही पायपीट करत तर काही लोक मोटारसायकलवर २० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी येतात.दररोजची ही त्यांची पायपीट आणि मोटारसायकलवर पाणी वाहण्याची शृंखला सुरू असल्याचे समजले. हे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे काम पाहून खूप वाईट वाटले. तेथील माता-भगिनींना पाण्यासाठी रोज तरसावे लागत होते.
त्याच क्षणी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला व मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या २४ तासाच्या आत तुमच्या घरापासून अगदी नजीकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतो. लगेचच यंत्रणा कामाला लावून आणि अवघ्या १०-१२ तासात तेथे प्रत्येकी २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. त्यात पाणी आणून जलपूजन केले व तात्काळ आजच्या आज ते लोकांना वापरासाठी उपलब्ध करून दिले'' आणि हे काम चमकोगिरीसाठी नसून समाजसेवेसाठी आहे असेही ते म्हणाले . यावेळी सुस च्या उपसरपंच दिशाताई ससार, नारायणराव चांदेरे, अनिल बापू ससार, .शशिकांत बालवडकर, स्थानिक नागरिक, महिला भगिनी व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.
यामध्ये माझा कोणताही चमकोगिरी करण्याचा उद्देश नाही. जनतेचं लवकरात लवकर व तात्काळ काम होणं हे माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यप्रती सदरील काम तात्काळ पूर्ण केले आणि नागरिकांची या समस्येतून सुटका केली. आज संध्याकाळी जेव्हा या भागात पाणी आलं त्यावेळेस इथल्या नागरिकांच्या व महिला भगिनींच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद बघून मला अतिशय समाधानी वाटले.


विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून मी सुस-म्हाळुंगे परिसराला रोज २० टँकर मोफत पाणी पुरवठा करीत आहे. इथून पुढील काळात ते ५० टँकरपर्यंत कसे जाईल हा माझा मानस आहे. आज या भागात मी १० टाक्या लावल्या, गरज पडल्यास केवळ १० टाक्याच नाही तर अजून २०, ३०, ५० जरी टाक्यांची आवश्यकता भासली तरी चालेल, मी माझ्या स्वखर्चाने येथे त्या उपलब्ध करून देईन . पण माझ्या माता भगिनींना कुठेही पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही, त्यांना त्यांच्या घराजवळच पाणी मिळेल याची योग्य ती काळजी मी घेईन .येणाऱ्या काळात जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला तर त्यांच्या घरात पाणी देण्याचा माझा जो मानस आहे तो निश्चित पूर्ण करेन . असे ही बालवडकर म्हणाले.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.