आता ओटीटीवरील चित्रपटांचा 'इफ्फी'मध्ये समावेश : अनुराग ठाकूर

18 Nov 2021 17:46:36

OTT_1  H x W: 0
नवी दिल्ली : गेले काही महिने देशातील चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे अनेक महत्त्वाचे चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. त्यामुळे आता भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ओटीटीवरील चित्रपटांचा समावेश करण्यात येणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. या निर्णयामुळे अनेक निर्मात्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.
 
 
 
"इफ्फीमध्ये सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार अमेरिकन चित्रपट निर्माता/ दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेस आणि हंगेरिअन चित्रपट निर्माता/ दिग्दर्शक इस्तावन झाबो यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशी यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येणार आहे." अशी माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. यंदा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात आयोजन गोव्यात करण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0